Ad will apear here
Next
उबरची पुण्यात विस्तार योजना
कृष्णा वीर सिंगपुणे : उबरऑटोच्या व्यवसायात मोठी वाढ करण्याच्या दृष्टीने उबरने पुण्यात आपल्या सेवेचा आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना इंडियाएसए राइड शेअरिंगच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कृष्णा वीर सिंग म्हणाले, ‘पुणे ही उबरची भारतातील सातवी सर्वांत मोठी बाजारपेठ असून, उबर इंटरसिटी मार्गासाठी पुणे सर्वांत लोकप्रिय केंद्र आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये उबरने येथे ऑटो, इंटरसिटी, हायर, प्रीमिअर, पूल, उबरगो आणि उबरएक्सएलसह अनेक पर्याय सादर केले आहेत. उबर इंटरसिटी सेवेने मुंबईसह महाराष्ट्रातील ५० हून अधिक ठिकाणे जोडली असून, यामध्ये लोणावळा, नाशिक व महाबळेश्वर अशा लोकप्रिय स्थळांचादेखील समावेश आहे. ऑन-डिमांड कार्स, सुरक्षित व आरामदायी प्रवास, प्रमाणित ड्रायव्हर यामुळे उबर इंटरसिटी ग्राहकांसाठी सर्वाधिक लोकप्रिय पर्याय ठरला आहे. उबर कार्सची संख्या, तसेच इंटरसिटी सेवेची ठिकाणे वाढवण्यावर कंपनीने भर दिला असून, त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून व्यवसाय वृद्धी होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.’ 

सिंग पुढे म्हणाले, ‘ड्रायव्हर भागीदारांसाठीही उबर विविध कल्याणकारी उपक्रम राबवते. यामध्ये उबर केअरसारख्या उपक्रमांसह संपूर्ण कुटुंबांसाठी जीवन विमा, आरोग्य विमा तसेच लहान कर्जेदेखील उपलब्ध केली जातात.’ 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi