Ad will apear here
Next
राम बांगड, राम बोरकर, स्वप्नील नाईक यांचा सन्मान
शिवप्रजाराज्यम, ग्रीन रिव्हॉल्यूशनतर्फे सन्मान
राम बोरकर, स्वप्नील नाईक, राम बांगड

पुणे : ‘शिवप्रजाराज्यम आणि ग्रीन रिव्हॉल्यूशन या संस्थाच्या वतीने उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी राम बांगड, राम बोरकर, स्वप्नील नाईक यांचा सत्कार करण्यात येणार आहे,’ अशी माहिती शिवप्रजाराज्यमचे अध्यक्ष अनंत घरत, ग्रीन रिव्हॉल्यूशनचे अध्यक्ष किशोर रजपूत आणि निमंत्रक ललित राठी यांनी दिली.

‘राम बांगड यांना रक्तमहर्षी गौरव सन्मान, राम बोरकर यांना लोकसेवक गौरव सन्मान, तर स्वप्नील नाईक यांना युवा गौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवारी, २३ ऑगस्ट रोजी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे सायंकाळी साडेचार वाजता हा नागरी गौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे. महिला गृहउद्योग लिज्जत पापडचे व्यवस्थापक सुरेश कोते आणि अॅड. प्रतापसिंह परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,’ असेही आयोजकांनी सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language