Ad will apear here
Next
पुणे, बारामती मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक नियुक्त
पुणे :  पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून, त्यांचे पुण्यात आगमन झाले आहे. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये त्यांचे वास्तव्य आहे, असे अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी,निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (२०८ वडगांवशेरी, २०९ –शिवाजीनगर, २१२ -पर्वती व २१५-कसबापेठ विधानसभा मतदारसंघ) रजत अगरवाल यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना सर्किट हाऊसमध्ये कक्ष क्रमांक ए-१०३ येथे सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सायंकाळी चार ते पाच या वेळेत भेटता येईल. त्यांचा मोबाइल क्रमांक ८२७५९ ६९५०३ व observer1.pune34@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे. 

पुणे लोकसभा मतदार संघासाठी (२१० -कोथरुड व २१४-पुणे कँटोनमेंट विधानसभा मतदारसंघ) राजीव श्रीवास्तव यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते कक्ष क्रमांक ए-१०५ मध्ये वास्तव्यास असून, त्यांना दररोज पाच ते सहा या वेळेत भेटता येईल. त्यांचा मोबाइल क्रमांक ८२७५९६९५०४ असा असून, observer2.pune34@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे.
 
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी राजेश शर्मा सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते कक्ष क्रमांक ए-१०६ येथे त्यांचे वास्तव्यास असून, त्यांना सोमवार व गुरुवार या दिवशी दुपारी तीन ते पाच या कालावधीत भेटता येईल. त्यांचा मोबाइल क्रमांक ८२७५९ ६९५०९ असा असून observer.baramati35@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language