Ad will apear here
Next
हिंजवडीतील समस्यांबाबत बैठक
गिरीश बापटपुणे : हिंजवडी येथील विविध समस्यांबाबत सात डिसेंबरला मुंबई येथे बैठक होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई हे ही उपस्थित राहणार आहेत.

हिंजवडीला लवकरात लवकर समस्यामुक्त करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट प्रयत्नशील आहेत. हिंजवडी येथील समस्यांबाबत त्यांनी उद्या मुंबई येथे उद्योग मंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उद्योग मंत्र्यांना हिंजवडीतील समस्यांबाबत माहिती देऊन यावर ठोस उपाय योजना आखण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, हिंजवडी इंडस्ट्रीज असोशिएशनचे पदाधिकारी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए तसेच अन्य सबंधित विभागाचे अधिकारीही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

सुभाष देसाईहिंजवडी येथील आयटी पार्कमधील वाहतूक सुविधा, रस्ते, पार्किंग, सुरक्षा तसेच घनकचरा व्यवस्थापन, या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी विविध शासकीय अधिकारी तसेच ‘एचआयए’चे पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांना केल्या होत्या.

या भागाचा प्रत्यक्ष दौरा करून त्यांनी या समस्यांचा आढावा ही घेतला होता. हिंजवडीतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी मेट्रोसारखे दीर्घकालीन उपाय सुचवले आहेत. त्याचप्रमाणे रस्ता रुंदीकरण, आवश्यक तेथे उड्डाणपूल, पर्यायी रस्ते करण्याबाबत आदेश दिले आहेत. हिंजवडीला जाणाऱ्या पर्यायी रस्त्यांची स्वत: पाहणी करून सबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

म्हाळुंगे, हिंजवडी, मान येथील बाधित शेतकऱ्यांना वाढीव एफएसआय, टीडीआरच्या माध्यमातून लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत समाजसेवी संस्थांची मदत घेण्याची सूचना केली आहे. या समस्या सोडवण्यासाठी दीर्घ, मध्यम आणि अल्पकालीन उपाययोजना करण्याबाबत बापट प्रयत्नशील असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. यामुळे काही प्रमाणात या समस्यांचे निराकरण झाले आहे; मात्र या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

बुधवारी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. संसदीय कार्य मंत्री म्हणून या निवडणुकीची धामधूम असतानाही बापट यांनी ही बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language