Ad will apear here
Next
‘उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन द्यावे’
बॉलिवूडचे नृत्यदिग्दर्शक मुदस्सर खान यांचे ठाण्यात आवाहन

ठाणे : ‘उदयोन्मुख प्रतिभेला नेहमी भरपूर प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण हेच प्रोत्साहन त्यांच्याकरिता पुढील प्रगतीसाठी आवश्यक जीवनसत्त्वे पुरवण्याचे काम करते’, असे आवाहन प्रसिद्ध बॉलीवूड नृत्यदिग्दर्शक मुदस्सर खान यांनी केले. ‘अखिल भारतीय अग्रवाल संमेलन’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘डान्स ठाणे डान्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते. 

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियम याठिकाणी नुकताच हा कार्यक्रम पार पडला. बॉलीवूड नृत्यदिग्दर्शक आणि लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो ‘डांस इंडिया डांस’मध्ये पंच राहिलेले मुदस्सर खान या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नृत्यकलेतील होतकरू प्रतिभांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक-उद्योजक महेश बन्सीधर अग्रवाल यांच्या विशेष मेहनतीने साकार झालेल्या सदर कार्यक्रमात समाजसेवक दिनेश गोकुळचंद अग्रवाल हे प्रमुख पंच (ज्युरी) म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक युवा उद्योजक-समाजसेवक गृहस्थ-युगल गौरव व दर्शना अग्रवाल हे होते. इतर प्रायोजकांमध्ये सुभाष अग्रवाल, संदीप गर्ग, नरेंद्र गुप्ता, अतुल गोयल यांचा समावेश होता. 

विविध लोकाभिमूख सामाजिक-सर्जनशील कार्यांमध्ये अग्रगण्य ‘अखिल भारतीय अग्रवाल संमेलन’ या संस्थेच्या ठाणे शाखेच्या वतीने झालेल्या या स्पर्धात्मक कार्यक्रमात मुदस्सर खान यांच्यासह भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पंच सदस्या रेखा गुप्ता, चित्रपट निर्मात्री मानसी बागला व चित्रपट अभिनेते रमेश गोयल हेदेखील पंच म्हणून उपस्थित होते. ‘उदयोन्मुख प्रतिभांसाठी या संस्थेचे हे व्यासपीठ म्हणजे नृत्यकलेचे आराध्यदैवत नटराज यांच्या आशीर्वादासारखे आहे, ज्याच्या साहाय्याने पुढील प्रगतीची संधी उपलब्ध होत आहे’, असे उद्गार याप्रसंगी संस्थेच्या राष्ट्रीय सचिव सुमन अग्रवाल यांनी काढले. 

अनिल अग्रवाल यांच्या संयोजनाखाली झालेल्या ‘डांन्स ठाणे डान्स’ कार्यक्रमात संस्थेचे राष्ट्रीय उपसरचिटणीस डॉ. राजेंद्र अग्रवाल, मुंबई अध्यक्ष शिवकांत खेतान, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप गुप्ता, मुंबईचे उपाध्यक्ष सुरेंद्र रुईया, ब्रिजबिहारी मित्तल, रमणलालजी अग्रवाल (चौधरी), सुरेशचंद अग्रवाल, शितल अग्रवाल, लक्ष्मीनारायण अग्रवाल (मन्नु शेट), डालचंद गुप्ता, ओमप्रकाश अग्रवाल, ब्रिजमोहन अग्रवाल (अजंता), शैलेंद्र गोयल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. 

सर्व स्पर्धकांनी केलेल्या विविध नृत्याविष्कारांच्या आकर्षक सादरीकरणाने प्रेक्षकांनी भरलेले सभागृह बहरून गेले. समूह व एकेरी अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या प्रथम विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये ३१ हजार आणि २१ हजार व करंडक देऊन सन्मानित करण्यात आले तर व्दितीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार व ११ हजार आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना ११ हजार व पाच हजार रोख रुपयांसह करंडक प्रदान करण्यात आले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ठाणे अध्यक्ष कैलाश गोयल, खजिनदार विकास बंसल, संजीव अग्रवाल, नवीन अग्रवाल, सुरेश पहाड़िया, नितिन बजारी, चतुर्भुज अग्रवाल, पवन अग्रवाल, राजेश हलवाई, अशोक अग्रवाल, प्रदिप गोयंका, संजय मित्तल, अशोक जैन, जितेंद्र अग्रवाल आदींचा सिंहाचा वाटा होता.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language