Ad will apear here
Next
दसरा-दिवाळी-नाताळसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
नाशिक : दसरा-दिवाळी-नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांसाठी विविध मार्गांवर अतिरिक्त गाड्या सोडणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. एक ऑक्टोबरपासून या गाड्या सुरू होत आहेत.

०२१०७ डाउन मुंबई-लखनौ सुपर फास्ट गाडी मुंबईहून लखनौला मंगळवारी एक ऑक्टोबरला दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी प्रस्थान करेल. या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या दर मंगळवारी होतील. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, कानपूर येथे ती थांबा घेईल. ०१०२० अप लखनौ-मुंबई ही गाडी लखनौहून बुधवारी दोन ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता निघेल. दर बुधवारी तिच्या सहा फेऱ्या होतील.

०१०२५ डाउन मुंबई एलटीटी-मंडुआ दहिआ सुपरफास्ट गाडी २३ ऑक्टोबरला मध्यरात्री पाऊण वाजता प्रस्थान करेल. दर बुधवारी ती धावेल. कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, अलाहबाद, ज्ञानपूर येथे ती थांबा घेईल. ०२०४६ अप मंडुआ दहिआ एलटीटी एक्सप्रेस दर गुरुवारी धावेल. तिच्या तीन फेऱ्या होतील. २४ ऑक्टोबरला सकाळी साडेसहाला ती मंडुआवरून निघेल. 

०११३३ डाउन मुंबई एलटीटी-बरौनी सुपरफास्ट गाडी एलटीटी-बरौनी गाडी गुरुवारी २४ ऑक्टोबरला सकाळी पाच वाजून १० मिनिटांनी निघेल. ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरीया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, अलाहबाद चोकी, मिर्झापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर येथे ती थांबेल. ०११३४ अप बरौनी-एलटीटी गाडी दर शुक्रवारी धावेल. तिच्या तीन फेऱ्या होतील. शुक्रवारी, २५ ऑक्टोबरला ती सायंकाळी साडेसात वाजता मुंबईकडे निघेल. 

०१४५३ डाउन पुणे-गोरखपूर गाडी सोमवारी २१ ऑक्टोबरला पुण्याहून रात्री साडेनऊला प्रस्थान करेल. मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाल, बीना, झाशी, कानपूर, लखनौ, बाराबंकी, गोंडा, बस्ती येथे ती थांबेल.

०८६०९ अप हटिया-एलटीटी गाडी दर बुधवारी पाच फेऱ्या करेल. दोन ऑक्टोबरला सायंकाळी ५.३५ वाजता ती हटियाहून मुंबईकडे प्रस्थान करेल.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi