Ad will apear here
Next
केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार सोहळा
१०८ केंद्र प्रमुखांचा सत्कार व गौरवग्रंथांचे प्रकाशन
पुणे : ‘भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने १०८ सेवाशाखा संकल्पपूर्ती सत्कार व केशायुर्वेद पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवार, १९ जुलै २०१९ रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत पत्रकार भवन येथे हा सोहळा रंगणार आहे,’ अशी माहिती केशायुर्वेदचे संचालक डॉ. हरिश पाटणकर यांनी दिली.

‘या सोहळ्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश डुंबरे, बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, भारत विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्ताजी गायकवाड आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. गेल्या तीन वर्षांत केशायुर्वेदच्या देश-विदेशात १०८ सेवा शाखा उभारण्यात आल्या आहेत. त्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाखांच्या प्रमुखांना केशायुर्वेद गौरव, भूषण, रत्न आणि मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘काया-केश कल्पना’ आणि केशायुर्वेद गौरवग्रंथांचे प्रकाशन होणार आहे,’ असेही  डॉ. हरिश पाटणकर यांनी सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi