Ad will apear here
Next
गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी राधेश बादले-पाटील
सोलापूर : मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून पंढरपूरचे राधेश बादले-पाटील यांची निवड झाली. मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे २३ जून २०१९ रोजी ही निवड जाहीर केली. 

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील योगेश बोबडे यांची राजर्षी शाहू महाराज शिक्षण परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी, तर अकलूज खंडाळी येथील बाळासाहेब पवार व इस्लामपूर (ता. माळशिरस) येथील ज्ञानेश्वर पवार यांची महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या राज्य संघटकपदी शिराळ टेंभुर्णी येथील नागनाथराव संदीपान महाडिक यांची, तर संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पुळुज (ता. पंढरपूर) येथील शिभप सूर्याजीमहाराज भोसले यांची निवड करण्यात आली. गणेश नीळ व जी. के. देशमुख यांची शिक्षण परिषदेच्या राज्य संघटकपदी निवड करण्यात आली. या सर्व निवडी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, महासचिव मधुकर मेहकरे, सोमनाथ लडके, पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमबापू माने आदी मान्यवरांनी जाहीर केले.

या वेळी राज्यातून शेकडो कार्यकर्ते व सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार (माळशिरस), सदाशिव पवार, जीवन यादव (सोलापूर), सेवानिवृत्त फौजदार शाहूराजे दळवी (अकलूज) आदी मान्यवर उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language