Ad will apear here
Next
यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम


रत्नागिरी :
दी यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे शिक्षक दिनानिमित्त नुकताच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अवयवदान मोहिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक आनंद आंबेकर, फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वदस्त माधवी माने आणि मिहीर माने, विराज माने, प्राचार्य डॉ. मीनाक्षी देवांगमठ आदी उपस्थित होते.



प्रा. आनंद आंबेकर म्हणाले, ‘रत्नागिरी जिल्ह्यातील नर्सेसची भूमिका यावर मी पीएचडीसाठी प्रबंध लिहिला आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांतील नर्सेसची भूमिका किती संवेदनशील आहे, या संदर्भात त्यात नऊ वर्षे संशोधन करून लिहिले आहे. समाजात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नर्सेसना कोणतीही कारणे न देता रुग्णसेवेसाठी वाहून घ्यावे लागते. विविध भूमिकांमधून वावरावे लागते. त्यामुळे तुम्ही सर्व भावी नर्स-ब्रदर आहात, त्यांनी या क्षेत्राचा अभिमान बाळगला पाहिजे.’



दीपप्रज्ज्वलन व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. फाउंडेशनचे विश्वास्त बाळ माने यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. रजिस्ट्रार शलाका लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. प्रा. चेतन अंबुपे, प्रा. रमेश बंडगर, प्रा. जैसन डॅनियल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. 



 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi