Ad will apear here
Next
मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८

मुंबई : राज्यात गुंतवणूकीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने या वर्षातील पहिली मोठी आर्थिक झेप घेत; राज्यातील पहिल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८’ या जागतिक गुंतवणूक परिषदेची घोषणा सहा जानेवारी रोजी केली. अत्याधुनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी तसेच, पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंड येथे १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेच्या #MadeForBusiness या टॅगलाईनचे अनावरण केले. ही पहिलीच तीन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषद रोजगार, शाश्वतता, पायाभूत सोयीसुविधा आणि भविष्यकालीन उद्योग या चार मुद्द्यांवर आधारित आहे.

या परिषदेबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमच्या या पहिल्या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्राची भारतातील सर्व औद्योगिक गुंतवणुकीचे प्रवेशद्वार ही ओळख आणखी भक्कम करण्याचा आमचा हेतू आहे. सर्वोत्कृष्ट बुद्धिमत्ता, उद्योग आणि सरकारी यंत्रणांच्या समन्वयातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल.’
‘औद्योगिक नाविन्यता आणि स्मार्ट उत्पादकतेमध्ये जगभरात सातत्याने अव्वल स्थानी असणारे एक फ्युचर रेडी; म्हणजेच भविष्यासाठी सज्ज असलेले राज्य उभारण्यावर आम्ही भर देत आहोत,’ अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

याप्रसंगी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८’ हे स्मार्टफोन अॅप्लिकेशन तसेच, या परिषदेविषयीची सर्व माहिती पुरवणाऱ्या www.midcindia.org/convergence2018/registration या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०’ या स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध परिक्षकांनी परीक्षण केल्यानंतर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात येतील. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या व्यावसायिकाला बक्षिस म्हणून ५० लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार असून, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे ३० लाख व २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८’ या उपक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या तीन दिवसीय परिषदेत संवादात्मक परिषदा, चर्चासत्रे, सीईओ राऊंडटेबल परिषदा, बी टू बी आणि बी टू जी बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातून राज्य आणि सरकारांचे प्रमुख, राजकीय आणि कॉर्पोरेट नेते, धोरणकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एकाच छताखाली आणण्याचा उद्देश आहे.
 
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, ‘राष्ट्रीय जीडीपीमध्ये आज महाराष्ट्राचे योगदान १५ टक्के असून, सध्याच्या वित्तवर्षात यात आणखी ९.४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
मेक इन इंडिया मोहिमेत महत्त्वाचा वाटा असलेल्या उत्पादन क्षेत्राचा, राज्याच्या जीएसडीपीमध्ये २१.४३ टक्के वाटा आहे. या वित्तवर्षाच्या पहिल्या सहामाहीत आम्ही एकूण ४५.४२ टक्के परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी झालो आहोत. महाराष्ट्र ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून, तसेच बॉलीवुडसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून, महाराष्ट्राला भारताची उत्पादन व व्यापार राजधानी बनवण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत.’

दृकश्राव्य प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वैविध्य आणि स्त्रोतांची उपलब्धता यावर प्रकाश टाकणाऱ्या या परिषदेची संकल्पना व आयोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे आहे. सीआयआय यांनी या परिषदेत राष्ट्रीय भागीदार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ‘केपीएमजी’ या परिषदेचे नॉलेज पार्टनर आहे.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language