Ad will apear here
Next
‘निवडणुकीचे काम करताना गोंधळून जाऊ नका’
विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांचा सल्ला

पुणे : ‘निवडणुकीचे काम करताना गोंधळून जाऊ नका, तुमच्‍या कार्यक्षमतेवर आमचा विश्‍वास आहे, पण तुमचा स्‍वत:वर विश्‍वास असला पाहिजे,’ अशा शब्‍दांत विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा उत्‍साह वाढवला. 

जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सी-विंगमधील नवीन सभागृहात क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण १७ एप्रिल २०१९ रोजी आयोजित करण्‍यात आले होते. त्‍यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, बारामतीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष डुंबरे, निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल, पोलीस ऑब्‍झर्व्‍हर आयुष मनी तिवारी, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, समन्‍वय अधिकारी डॉ. ज्‍योत्‍स्‍ना पडियार, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, तज्ज्ञ आशिष चौधरी, उपायुक्‍त नीलिमा धायगुडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींची उपस्थिती होती.


विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, ‘निवडणूक सहजतेने घेऊ नका, निवडणुकांचा अनुभव असला, तरी या वेळी व्‍हीव्‍हीपॅट यंत्रामुळे त्‍याचे अद्ययावत ज्ञान असणे आवश्‍यक आहे. ईव्‍हीएम आणि व्‍हीव्‍हीपॅटची हाताळणी योग्य पद्धतीने करा. आपल्‍या सर्वांच्‍या प्रयत्‍नांमुळे निवडणूक शांत वातावरणात पार पडेल.’ 

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, ‘निवडणुकीच्‍या कामावरील कर्मचाऱ्यांना योग्‍य ते प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. काही शंका असतील, तर त्‍याचे आत्ताच निराकरण करून घ्‍या, ऐनवेळी गोंधळ निर्माण व्‍हायला नको. मतदान यंत्रांची हाताळणी करताना काळजी घेतली पाहिजे. प्रशिक्षणामध्‍ये ज्‍याक्रमाने जोडणी सांगितली आहे, त्‍या पद्धतीने झाली पाहिजे.’ 

निवडणूक निरीक्षक अग्रवाल यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. समन्‍वय अधिकारी डॉ. पडियार आणि चौधरी या दोघांनी उपस्थित कर्मचारी-अधिकाऱ्यांना मतदान यंत्रांबाबतची पुन्‍हा एकदा माहिती दिली; तसेच त्‍यांच्‍या शंकांचे निरसन केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language