Ad will apear here
Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात आविष्कार कार्यशाळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील आविष्कार कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शरद फसाले

पुणे : विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी रयत शिक्षण संस्था व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे गेली अनेक वर्ष आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे, तसेच त्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नुकतीच आविष्कार कार्यशाळा घेण्यात झाली.

 एस. एम. जोशी महाविद्यालयातील इनोव्हेशन सेंटरचे समन्वयक डॉ. शरद फसाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, आविष्कार समितीचे प्रमुख प्रा. कुशल पाखले, डॉ. रमेश रणदिवे, डॉ. सुशिलकुमार गुजर, डॉ. तानाजी हातेकर, प्रा. मयुर माळी, डॉ. सविता पाटील, प्रा. स्नेहल रेडे प्रा. गौरी पवार, प्रा. भक्ती पाटील आदी प्राध्यापक या वेळी उपस्थित होते. कला, वाणिज्य, बीबीए व बी. व्होक विभागातील निवडक पन्नास विद्यार्थ्यांना या कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले. 

प्रा. डॉ. शरद फसाले यांनी जगातील व भारतातील विविध भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा आढावा घेत, भारतीय विद्यार्थ्यांमध्येही कल्पकता व नवनिर्मिती करण्याची क्षमता असल्याचे नमूद केले. ‘आता आपणास केवळ पेटंट, रिसर्च येथेच थांबून चालणार नाही, तर त्याचा व्यावसायिक उपयोग करण्याची गरज आहे,’असेही त्यांनी सांगितले. 

डॉ. संजय नगरकर म्हणाले, ‘सर्व काही निसर्गातच उपलब्ध असते. आपण फक्त ते शोधणे व प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी डोळसपणा असेल, तर साध्या-साध्या गोष्टींतूनही खूप काही निर्माण करता येऊ शकते. त्यासाठी भाषा, समाजशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, उद्योग-व्यवसाय यापैकी कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही.’

प्रास्ताविक प्रा. कुशल पाखले यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. सुशिलकुमार गुजर यांनी केले. प्रा. सायली गोसावी यांनी आभार मानले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi