Ad will apear here
Next
‘सिंहगड टेक्निकल’च्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम

पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या लोणावळा येथील कॅम्पसमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. लोणावळा कॅम्पसमधील प्राचार्य, संचालक, एन.एस.एस.चे विद्यार्थी यांनी २७ सागाची रोपे परिसरामध्ये लावली. 

त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी लूकडे साहेब यांच्या हस्ते केक कापून संस्थेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, प्राचार्य डॉ. रोहोकले, डॉ. जयवंत देसाई, डॉ. शिवाजी देसाई, प्राचार्य निर्मलकुमार मिश्रा, पंकज जाधव, विजय वसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गोळा केलेली मदत संबंधितांकडे सुपुर्द करण्यात आली. 


पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सेवकांचे एक दिवसाचे वेतन जमा करण्यात येणार असून, त्यात संस्थेतर्फे भर घालून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नवले यांनी जाहीर केले आहे. १२ ऑगस्ट १९९३ मध्ये प्रा. एम. एन. नवले यांनी स्थापना केलेल्या  सिंहगड संस्थेचा आता १२ कॅम्पसेस, ८५ इन्स्टिट्यूट व २६ शाळा असा विस्तार आहे. ९० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language