Ad will apear here
Next
२२ वर्षांनंतर कमल हसन यांच्या ‘इंडियन’चा सिक्वेल
अक्षय कुमार पुन्हा साकारणार खलनायक, सिनेमाचे पोस्टर प्रकाशित

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘२.०’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांचा २२ वर्षांपूर्वी आलेला ‘इंडियन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. आता ‘इंडियन २’ नावाने शंकर या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहेत. यामध्ये अभिनेते कमल हसन प्रमुख भूमिकेत असून बॉलीवूड स्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे.  

२२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला शंकर यांचा ‘इंडियन’ हा चित्रपट हिंदी आणि तामिळ या दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तब्बल २२ वर्षांनंतर ‘इंडियन २’ नावाने चित्रपटाचा सिक्वेल येत असून १८ जानेवारीपासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. अभिनेते कमल हसन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी या चित्रपटानंतर अभिनयातून पूर्णपणे निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्या धर्तीवर हा कमल हसन यांचा शेवटचा चित्रपट ठरेल का, अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये होत आहे. 

दरम्यान आगामी इंडियन २ चित्रपटात एक बॉलीवूड कलाकार असल्याचाही अंदाज वर्तवला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. शंकर यांच्याच ‘२.०’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसलेला अक्षय कुमार ‘इंडियन २’मधून पुन्हा एकदा खलनायकाच्याच भूमिकेत दिसणार आहे. रजनीकांत यांच्यासोबत खलनायक साकारलेला अक्षय आता कमल हसन यांच्याबरोबर खलनायक बनणार आहे. सुरुवातीला अभिनेता अजय देवगण याचा या भूमिकेसाठी विचार केला होता, मात्र त्याच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अक्षयच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.    

१९९६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ या चित्रपटात कमल हसन, मनीषा कोईराला आणि उर्मिला मातोंडकर हे प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तसेच या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे करण्याची कामगिरीही केली आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language