Ad will apear here
Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग पाच
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा पाचवा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी तात्याराव सावरकरांनी भारतमातेचे गुणगान  करणारी ‘जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे’ ही अजरामर कविता रचली. ती प्रत्येक भारतीयाला राष्ट्रभक्तीचे स्फुरण देते.

ब्रिटिशांनी बंदी घातलेल्या ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ या सावरकरांच्या ऐतिहासिक ग्रंथाचे भारतात गुप्तपणे वितरण केल्याबद्दल तात्यारावांचे थोरले बंधू बाबाराव सावरकरांना ब्रिटिशांनी काळ्या पाण्याच्या बंदिवासासाठी अंदमानात पाठवले. तात्याराव सावरकरांनी लंडनहून सौ. येसूवहिनीला सांत्वनपर लिहिलेले हृदयद्रावक पत्र आणि नंतर सावरकरांनी रचलेल्या अजरामर कविता, संपूर्ण सावरकर कुटुंबीयांच्या देशाप्रति अखंड बलिदान देण्याच्या अद्भुत मनःस्थितीचे वर्णन करतात.

लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा पाचवा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या चारही भागांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा सहावा भाग दोन जुलै २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language