Ad will apear here
Next
‘मुलगी झाली हो’ मुक्तनाट्य अभिव्यक्ती संघटनेतर्फे सादर
पुणे : अभिव्यक्ती संघटनेतर्फे ८०च्या दशकातील ‘मुलगी झाली हो’ हे मुक्तनाट्य  नुकतेच सादर करण्यात आले. हे नाटक महिलांची पूर्वीच्या काळात असणारी आणि सध्या असणारी परिस्थिती यावर भाष्य करणारे आहे. 

नाटकात महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या शिक्षण, नोकरी, हुंडा, लग्न आदी सर्व प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या नाटकाची संकल्पना ज्योती म्हापसेकर यांची असून त्यांनीच नाटकातील गीते लिहून त्यांना संगीत दिले आहे. 

संघटनेतर्फे आतापर्यंत या नाटकाचे सुमारे ३५० प्रयोग करण्यात आले आहेत. नाटकाच्या शेवटी अलका जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा यांनी केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language