Ad will apear here
Next
‘सामाजिक दायित्वाकडे पाहण्याचा कॉर्पोरेट क्षेत्राचा दृष्टीकोन बदलतोय’
डॉ. नौशाद फोर्ब्ज यांचे प्रतिपादन
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने धोरण पत्रिकेचे प्रकाशन करताना डॉ. नौशाद फोर्ब्ज यांच्यासह हितेंद्र सिंग, जे. श्रीधर, प्रदीप भार्गवा, मधुकर कोतवाल, विनायक केळकर, राजेंद्र एरंडे आदी.

पुणे : ‘सामाजिक दायित्व अर्थात सीएसआर याकडे बघण्याचा उद्योग विश्वाचा दृष्टीकोन गेल्या पाच वर्षांत सकारात्मकरित्या बदलत आहे. ही स्वागतार्ह बाब असून, नजीकच्या भविष्यात उद्योग विश्वातील कंपन्यांनी एकत्रित येत सीएसआरच्या माध्यमातून योजनाबद्ध विकास करण्याची गरज आहे,’ असे मत फोर्ब्ज मार्शलचे सहअध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्ज यांनी व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. फोर्ब्ज यांच्या हस्ते ‘गव्हर्नन्स अॅँड इफेक्टिव्हनेस ऑफ एनजीओज- द वे अहेड’ या धोरण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅँड अॅग्रीकल्चर अर्थात एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘गव्हर्नन्स अॅँड इफेक्टिव्हनेस ऑफ एनजीओज- द वे अहेड’ या धोरणपत्रिकेचे लेखक व ‘एल अॅँड टी’च्या संचालक मंडळाचे माजी सदस्य मधुकर कोतवाल, धोरण पत्रिकेचे सहलेखक व अलाईड डिजिटल सर्व्हिसेस लि.चे कॉर्पोरेट सल्लागार राजेंद्र एरंडे, बजाज ऑटो लि.चे सचिव व कम्प्लायन्स अधिकारी जे. श्रीधर, प्राज इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट सस्टेनॅबिलिटीचे प्रमुख विनायक केळकर आदी या वेळी उपस्थित होते.

नौशाद फोर्ब्जया वेळी बोलताना नौशाद फोर्ब्ज म्हणाले, ‘ गेल्या पाच वर्षांत सीएसआरकडे कंपन्या सकारात्मतेने पहात आहेत. इतकेच नाही तर याद्वारे काहीतरी बदल व्हावा यासाठीदेखील त्या प्रयत्नशील आहेत. हेच लक्षात घेत आपले शहर, आपला देश यांच्या गरजा ओळखत पुढील पाच वर्षात उद्योग विश्वातील कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून एकत्रितपणे योजनाबद्ध विकास करावा असे मला वाटते.’

‘याबरोबरच स्वयंसेवी संस्थांनी काम करताना अपेक्षित असलेली सुनियोजीतता व प्रभावीपणा या विषयीचे जे निकष या धोरण पत्रिकेत सांगण्यात आले आहेत. त्याचा फायदा स्वयंसेवी संस्थांना नक्की होईल,’ असेही ते म्हणाले.

‘भारतामध्ये सुमारे ३० लाखांहून अधिक स्वयंसेवी संस्था असून, कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने सुनियोजीतपणे व प्रभावीपणे कसे काम करावे याविषयीचे काही सूचना या धोरणपत्रिकेत दिल्या आहेत,’ असे प्रदीप भार्गवा यांनी नमूद केले. हितेंद्र सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language