Ad will apear here
Next
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे ‘अपसाउथ’मध्ये प्रदर्शन
माती, तुरटी, पंचगव्यापासून घडविलेल्या मूर्ती

पुणे : पाण्यात सहजपणे विरघळणाऱ्या माती, तुरटी, गायीचे शेण, पंचगव्य यापासून बनलेल्या; कोणताही रंग न दिलेल्या निव्वळ मातीच्या, तसेच नैसर्गिक रंगांमध्ये रंगवलेल्या आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन वाकड येथील अपसाउथ हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 

‘ग्रीन गणेश फाउंडेशन आणि अपसाऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शुद्धी गणेश’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गणेशमूर्तींचे प्रदर्शन शनिवारी(३१ ऑगस्ट) दिवसभर सुरू राहणार असून, पर्यावरण रक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे,’ असे बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटीचे उपाध्यक्ष कुमार गौरव यांनी सांगितले. 

‘अपसाउथचा नेहमीच पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या व्यवसायावर भर राहिला आहे. आमच्या सगळ्या उपक्रम आणि कृतींमधून ही गोष्ट अधोरेखित होते. हीच गोष्ट मनात ठेऊन हरित गणेशोत्सव ही संकल्पना पुढे आणण्यासाठी आम्ही या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘मातीत किंवा मातीच्या कुंडीमध्ये या गणेशमूर्तीचे विसर्जन करता येते. यामुळे विसर्जनानंतर पाणी प्रदूषित होण्याचा धोका नाही. या मूर्तींची किंमत ८०० ते १५०० रुपयांपर्यंत आहेत,’ असे ग्रीन गणेश फाउंडेशनचे संस्थापक रश्मी आणि शैलेश औसेकर यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९५२७४ ०२५००
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language