Ad will apear here
Next
‘रोजा इफ्तार’मध्ये सर्वधर्मियांचा सहभाग

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीभवन येथे २० मे २०१९ रोजी सायंकाळी ‘रोजा इफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत सलोख्याचे दर्शन घडवले.

या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोथरूडच्या वरिष्ठ  पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, लिज्जत पापड संस्थेचे कार्यकारी संचालक सुरेश कोते, मौलाना इसहाक शेख उपस्थित होते. गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांनी स्वागत केले.

मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी या कालावधीत गांधी स्मारक निधीतर्फे दर वर्षी ‘रोजा इफ्तार’चे आयोजन केले जाते. सर्वधर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र साजरे करून सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सर्वधर्मीय नागरिक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम आयोजित केला जात असल्याचे डॉ. सप्तर्षी यांनी या प्रसंगी सांगितले. ‘देशाला सर्वधर्म एकत्र, सलोख्याने राहण्याची आवश्यकता आहे. गांधींच्या विचाराने शांतता आणि एकात्मता पुढे गेली पाहिजे. द्वेष, दंग्यांपेक्षा प्रेम आणि सलोखा समाजासाठी महत्त्वाचा ठरेल,’ असेही ते म्हणाले. 


या वेळी सुरेश कोते, प्रतिभा जोशी, मौलाना इसहाक शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. कोते म्हणाले, ‘जाणीवपूर्वक अन्य धर्मियांबद्दल चुकीचा प्रचार केला जातो. चांगल्या-वाईट व्यक्तींचे प्रमाण सर्वत्र सारखे असते; मात्र तरीही त्याचे खापर संपूर्ण धर्मावर फोडण्याचे कारस्थान केले जाते. त्यामुळे देशाचे नुकसान होते.’

हे या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या वर्षी आयोजित केलेल्या ‘रोजा इफ्तार’मध्ये पुणे, कोथरूड, वारजे परिसरातील मुस्लिम बांधव, मशिदीचे पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले होते. इफ्तारनंतर नमाज पठण करण्यात आले. या प्रसंगी प्रशांत कोठडिया, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, इस्माईल शेख, मुख्तार मणियार, संदीप बर्वे, नुरुभाई पटेल, प्रवीण सप्तर्षी, जमील सय्यद, बाबा खान, माणिक दुधाणे, अभिजीत मंगल, हमीद शेख, इलीयास खान, आसिफ मिस्त्री, इक्बाल हवालदार, फिरोज मुल्ला, अॅड. संतोष म्हस्के, फिरोज मुल्ला, क्रांती माने, आनंद तांबे, दुर्गा शुक्रे उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language