Ad will apear here
Next
वंचितांचे पोट भरणारी ‘धान्य बँक’


ठाणे :
वंचितांच्या मुखी घास भरविण्यासाठी ठाण्यातील ‘वुई टुगेदर’ या सामाजिक संस्थेने धान्य बँक हा उपक्रम २०१५मध्ये सुरू केला. समाजातून निधी उभारून अनाथाश्रम, बालिकाश्रम, वृद्धाश्रमासारख्या संस्थांना धान्य बँकेतर्फे धान्याचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत या उपक्रमातून तीस हजार किलोंहून अधिक धान्याचे वाटप राज्याच्या विविध भागांत झाले आहे. राज्यात अनेक आधाराश्रम, बालिकाश्रम, वृद्धाश्रम, तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणावर धान्याची गरज असते. या संस्थांना मदत करण्याच्या हेतूने उज्ज्वला बागवाडे यांनी अनेक गृहिणींना एकत्र आणून धान्य बँक सुरू केली. ‘वुई टुगेदर’मार्फत या सर्व संस्थांना धान्य बँकेद्वारे धान्याचा पुरवठा केला जातो. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले असून, नागरिकांनी धान्य बँकेला मदत करून वंचितांचे पालनपोषणकर्ते बनावे असे आवाहन केले आहे.३० हजार किलो धान्यवाटप
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, मुंबई, गिरगाव, दादर, बोरिवली, मालाड, तसेच पुणे, नाशिक या शहरांत सध्या धान्य बँकेचे काम सुरू आहे. सध्या या बँकेला ११०० जण धान्यदान करत असून, ९० गृहिणी या बँकेचे काम सांभाळत आहेत. आतापर्यंत या बँकेमार्फत अनेक संस्थांना धान्यदान करण्यात आले आहे. अनेक संस्थांना धान्य बँकेने दत्तक घेतले आहे. ऊसतोड कामगार, परितक्त्या महिला, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वंचित मुलांसाठी काम करणारे बीडमधील शांतिवन, रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचे काम करणारे श्रद्धा फाउंडेशन, तमाशा कलावंत आणि पारधी समाजातील मुलांसाठी काम करणारी बीडमधील सेवाश्रम संस्था, तसेच पुणे, मुंबई, ठाणे, पेण जिल्ह्यातील ११ संस्थांना ही बँक धान्य पुरवत आहे. आतापर्यंत धान्य बँकेने ३० हजार किलोंपेक्षा जास्त धान्य सामाजिक संस्थांना देऊन वंचितांच्या मुखी घास भरविला आहे.बँकेला अशी मदत करता येईल
महिन्याचे ६० रुपये यानुसार वर्षाचे फक्त ७०० रुपये भरून या उपक्रमात सहभागी होता येते. शक्य असल्यास महिना १०० रुपये याप्रमाणे वर्षाचे १२०० रुपयेही जमा करता येतात. वाढदिवस, सण, समारंभांच्या वेळी धान्य किंवा धान्य विकत घेण्यासाठी निधी देता येतो. बँकेच्या अधिक माहितीसाठी उज्ज्वला बागवाडे (९७६९१ २५१४८) यांच्याशी संपर्क साधावा.

वेबसाइट : http://wetogetherorg.co.in/

(विविध क्षेत्रांत निःस्वार्थीपणे सामाजिक कार्य करणाऱ्या राज्यभरातील स्वयंसेवी संस्थांची खात्रीशीर माहिती ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातून प्रसिद्ध करण्यात येते. या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi