Ad will apear here
Next
पडघा मराठी शाळेत शाहू महाराज जयंती साजरी
भिवंडी : तालुक्यातील पडघा केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आज (२६ जून) राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख रमेश शेरे, मुख्याध्यापिका शोभा आहेर, माजी मुख्याध्यापिका साधना पाटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, सहशिक्षिका कुंदा कदम, हर्षला बांगर, संगिता लोखंडे, रेखा बगाडे, माधुरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  

कुंदा कदम यांनी प्रास्ताविकातून शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी युवा कवी जाधव यांनी विद्यार्थ्यांसमोर शाहू महाराजांचे कार्य सांगत ‘आरक्षणाचे जनक’, ‘शाळेमध्ये जिजाऊ’, ‘सावित्री, रमाई शिकवा ना’ या कविता सादर केल्या. केंद्रप्रमुख शेरे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महामानवांच्या कार्याची माहिती नेहमीच देण्याचे आवाहन करत आम्ही पाहुण्यांचे स्वागत फुलांनी न करता पेन, पुस्तक भेट म्हणून देऊन करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा कदम यांनी केले. शेरे यांनी आभार मानले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language