Ad will apear here
Next
शिवाजी विद्यापीठामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’साठी प्रवेश
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागामध्ये ‘पीजी डिप्लोमा इन ई-बिझनेस’ या अभ्यासक्रमासाठी २०१९-२० या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 

हा एक वर्ष कालावधीचा पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम विद्यापीठात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. या वर्षी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १० जुलै २०१९ पर्यंत भरायचे आहेत. हा प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या ॲनेक्स इमारतीमध्ये उपलब्ध आहे. या अभ्याक्रमासाठी कोणत्याही विषयाचे पदवीधारक विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांना प्रवेश घेता येणार आहे. 

विद्यार्थी, नोकरदारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन एमबीए अधिविभागाचे संचालक डॉ. एच. एम. ठकार यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी पत्ता : एमबीए अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
संपर्क क्रमांक : २६०९३६४, २६०९३७५ 
वेबसाइट : www.unishivaji.ac.in 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language