Ad will apear here
Next
पुनर्विवाह इच्छुकांचा मोफत परिचय मेळावा


पुणे :
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, डॉ. वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट व सप्तपदी वधू-वर केंद्रातर्फे सर्वधर्मीय परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हा मेळावा मोफत आहे. यामध्ये आंतरजातीय विवाहास इच्छुक विधवा, घटस्फोटीत, विधुर आणि दिव्यांग अशा सर्वांना सहभाग घेता येईल.   

हा मेळावा सात जुलै रोजी सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात दुपारी तीन ते सहा या वेळेत होईल. ज्या लोकांचे विवाह त्याचवेळी ठरतील; त्यांचे मेळावा झाल्यानंतर सत्यशोधक पद्धतीने लग्न लावून देण्यात येणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी २५ जूनपूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 

नावनोंदणीसाठी संपर्क :
रघुनाथ ढोक : ९९२२१ १६२३९
प्रल्हाद वडगांवकर : ९४२१० ००७८०
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language