Ad will apear here
Next
‘३७०’ हटवल्यानंतर काश्मिरात फिल्मसिटी; अबुधाबीचे शेट्टी करणार गुंतवणूक

अबुधाबी : भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात फिल्मसिटी उभारण्याची घोषणा अबुधाबी येथील अब्जाधीश उद्योगपती बी. आर. शेट्टी यांनी केली आहे. ‘अरेबियन बिझनेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल माहिती दिली. कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यानंतर काश्मीरचा विकास होण्याच्या दृष्टीने घडामोडी घडू लागल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. 

बी. आर. शेट्टी
भारतीय आणि परदेशातील चित्रपट दिग्दर्शकांना नेहमीच काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ पडत आली आहे; मात्र दहशतवादामुळे काश्मिरातील चित्रीकरणाचे प्रमाण कमी झाले. तसेच, कलम ३७० आणि ३५ अ लागू असल्यामुळे बाहेरच्या राज्यातील कोणालाही तेथे जमीन खरेदी करून काही उद्योग करणे शक्य होत नव्हते. ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने ही दोन कलमे हटवून काश्मिरात केंद्रशासित व्यवस्था आणली आहे. त्यानंतर या भागाच्या विकासासाठी, गुंतवणुकीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याकरिता हालचाली होऊ लागल्या आहेत.

‘जम्मू, काश्मीर आणि लडाखचा परिसर अत्यंत रमणीय असून, येथे फिल्मसिटी उभारल्यास भारतातील चित्रपटसृष्टीला कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होईल. तसेच पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल. याकरिता जम्मू, काश्मीर आणि लडाखमधून तीन हजार एकर जमीन विकत घेण्यासाठीचे प्रस्ताव माझ्याकडे आले आहेत,’ असे शेट्टी यांनी मुलाखतीत सांगितले. शेट्टी हे बीआरएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

‘या प्रकल्पाकरिता माझ्या स्वतःच्या गुंतवणुकीबरोबरच सौदी अरेबिया, बहारीन आणि अबुधाबीच्या राजघराण्यांशी निगडित खासगी फंडांकडून भांडवल उभारण्यात येणार आहे,’ असेही शेट्टी यांनी नमूद केले. काही आंतरराष्ट्रीय बँकाही यासाठी अर्थसाह्य करण्यास इच्छुक असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

ऑगस्ट महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली होती, तेव्हा शेट्टी यांनी जम्मू आणि काश्मीरसाठी एक अब्ज डॉलर्स, तर नवीन भारत विकास फंडासाठी पाच अब्ज डॉलर्सचे तारण जाहीर केले होते. याआधी त्यांनी भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते. तसेच १५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करून ‘दी महाभारत’ या भारतातील आतापर्यंतच्या सर्वांत भव्य चित्रपटाची घोषणा केली होती. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi