Ad will apear here
Next
‘कोथरूड भूषण पुरस्कार २०१९’ची घोषणा लवकरच
पुणे : ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टच्या वतीने दर वर्षी देण्यात येणारा कोथरूड भूषण पुरस्कार लवकरच जाहीर होणार आहे. शहरातील कोथरूड परिसरात प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराचा २०१९चा पुमानकरी कोण ही उत्सुकता सगळ्यांना लागली आहे,’ अशी माहिती अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.   

गेल्या सात वर्षांपासून कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंताना ट्रस्टतर्फे ‘कोथरूड भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. या पुरस्कारामुळे कलेच्या माध्यमातून भविष्यात उभारी घेणाऱ्या नवोदितांना मदत होत आहे. 

२४ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या दहीहंडी उत्सवात हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा कार्यक्रम शिक्षकनगर, खेळाचे मैदान उत्सव मंगल कार्यलयाशेजारी, कोथरूड येथे होणार आहे. ना मदत होते. बढेकर ग्रुप, वेंकीज आणि गोयल गंगा ग्रुप हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक असल्याचे म्हस्के आणि गुरनानी यांनी सांगितले.  

समाजात काहीतरी करू इच्छिणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या कोथरूडमधील गुणवंत, कलावंतांना ट्रस्टतर्फे  पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार ट्रस्टच्या दहीहंडी उत्सवादरम्यान नामवंत कलाकारांच्या हस्ते प्रदान केला जातो. २०१३मध्ये गायिका सायली पानसे, २०१४मध्ये गिर्यारोहक आनंद माळी, २०१५मध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, कलाकार प्रवीण तरडे, २०१६मध्ये मोटोक्रॉस बेस्ट रायडर ऋग्वेद बारगुजे, २०१७मध्ये गिरीप्रेमी किशोर धनकुडे यांना २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय कबड्डीपटू सागर खळदकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language