Ad will apear here
Next
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे प्रतिपादन

पुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत मतदान व मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिली. या वेळी निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. 

या वेळी मतदान साहित्य वितरण, मतमोजणी केंद्र व स्ट्राँगरुम, दिव्यांग मतदारांना सुविधा, मतदान केंद्राचे वेब कास्टींग, मतदार चिठ्ठी वाटप, इव्हीएम मशीनची मागणी, मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, सी-व्हीजील व मतमोजणीची व्यवस्था, तात्पुरते मतदान केंद्र उभारणी, मतदान केंद्रावरील सुविधा इत्यादीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम
‘मतदानासाठी लागणाऱ्या साहित्य वितरणाचे नियोजन काळजीपूर्वक करण्यात यावे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रे काळजीपूर्वक हाताळण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात. दिव्यांग, वृध्द व महिला मतदारांसाठी विविध सुविधा पुरविण्याचे आयोगाचे आदेश आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी,’ अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

‘२१ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याअगोदर राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोर करण्यात येणारे मॉक पोल काळजीपूर्वक करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आयोगाने दिलेले विविध अर्जांचे नमुने वेळोवेळी भरण्यात यावे,’ असेही नवल किशोर राम यांनी सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi