Ad will apear here
Next
‘ती’ काढते पितळी शिल्पांची ‘सोन्यासारखी’ चित्रे; मुंबईत प्रदर्शन सुरू


मुंबई :
मुंबईतील रीना नाईक या चित्रकर्तीने काढलेल्या पितळी शिल्पांच्या अप्रतिम चित्रांचे ‘ब्रास इम्प्रेशन्स’ हे प्रदर्शन २४ सप्टेंबरपासून वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये सुरू झाले आहे. पितळ या धातूपासून घडवलेल्या देवांच्या मूर्तींची कॅनव्हासवर ऑइल पेंटद्वारे काढलेली १४ सुंदर चित्रे या प्रदर्शनात समाविष्ट आहेत. ‘कार्पल टनेल डिसीज’ या विकारामुळे त्यांना उजवा हात काही महिने वापरता येत नव्हता; त्यावर मात करून त्यांनी हे पहिलेवहिले प्रदर्शन भरविले आहे. 

रीना नाईक या पुरस्कारप्राप्त एचआर प्रोफेशनल आहेत. पितळाचा रंग त्यांना कायमच आकर्षित करत होता. चित्रकलेची त्यांना आवड होती. त्यामुळे त्यांनी चित्रकला हाच आपला व्यवसाय बनविला. 

बासरी वाजविणारा श्रीकृष्ण, कालिया सापावरील गोविंदा, शंखामध्ये विराजमान गणपतीबाप्पा, गुलाबाच्या पाकळ्यांद्वारे अर्पिलेली भक्ती अशा एकाहून एक सुंदर पितळी मूर्तींची चित्रे रीना यांनी कॅनव्हासवर जिवंत केली आहेत. त्या म्हणतात, ‘मला पितळाचा रंग आणि आरास खूप आवडते. पितळ हा एक पवित्र धातू आहे आणि त्याचे ठसे कायमचे उमटतात. आपण ज्या देवतांची मनोभावे उपासना करतो, त्यांची छाप आपल्याला या चित्रांतून दिसून येते.’

‘पेन्सिल न वापरता मी फक्त ब्रश एका रिक्त कॅनव्हासवर वापरते. मी फक्त सकारात्मक ऊर्जा माझ्याद्वारे वाहू देते आणि तीच कॅनव्हासवर उमटते. एखादी कलाकृती पूर्ण करण्यास पंधरा दिवसांपासून महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो,’ असेही त्यांनी सांगितले.

हे जितके सोपे दिसते आहे, तितकेच ते त्यांच्यासाठी सोपे नव्हते. एका अपघातामुळे त्यांना कार्पल टनेल सिंड्रोम या विकाराला सामोरे जावे लागले आणि डॉक्टरांनी त्यांना त्यांचा उजवा हात न वापरण्याचा सल्ला दिला. ‘डॉक्टरांनी मला हे सांगितले, तेव्हा मला वाटले, की कला क्षेत्रात माझी कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली आहे; पण काही महिन्यांच्या थेरपीनंतर मी बरी झाले आणि पुन्हा एक नवीन सुरुवात केली,’ असे त्यांनी सांगितले. 

वारंवार रुग्णालयात दाखल व्हावे लागत असूनही रीना यांनी त्यांच्या या पहिल्या प्रदर्शनासाठीच्या पंधरापैकी चौदा कलाकृती पूर्ण केल्या आहेत. जिद्द आणि चिकाटीने प्रत्येक संकटावर मात करता येऊ शकते, हे रीना यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.

प्रदर्शनाविषयी :
ब्रास इम्प्रेशन्स
स्थळ : नेहरू सेंटर, वरळी, मुंबई
कालावधी : २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१९
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi