Ad will apear here
Next
‘मानवाच्या अंतर्बाह्य परिवर्तनासाठी ध्यानसाधना उपयुक्त’
डॉ. शिवमुनीजी यांचे मत
डॉ. शिवमुनी महाराज यांना सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना राजेश पांडे, डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, राजेश सांकला आदी

पुणे : ‘माणसाच्या आंतरिक परिवर्तनासाठी ध्यानसाधना अतिशय गरजेची असते. त्यामुळे आपली एकाग्रता व निर्णयक्षमता वाढते. प्रत्येक व्यक्तीने ध्यान केले पाहिजे. ध्यान आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती ध्यानाने व्हायला हवी,’ असे मत परमपूज्य डॉ. शिवमुनीजी यांनी व्यक्त केले.

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘सूर्यरत्न-आधुनिक भारताचे संत : सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ परमपूज्य डॉ. श्री शिवमुनीजी म. सा. यांना त्यांच्या ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव राजेश पांडे यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 

डॉ. शिवमुनीजी
या वेळी प्रवर्तक रमणिक मुनीजी, सामाजिक कार्यकर्ते विजयकांत कोठारी, उद्योजक राजेश सांकला, विजय भंडारी, दीपचंद पारख, पोपटशेठ ओस्तवाल, सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्यासह जैन मुनिजन आणि  देशभरातून सात हजारांहून अधिक भक्तगण  उपस्थित होते. पर्युषण पर्वाच्या निमित्ताने आचार्य शिवमुनीजी बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक भवनात आलेले आहेत.
 
‘भारतीय संस्कृती, मूल्यांची शिकवण देणाऱ्या, अध्यात्मिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या महान संतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा डॉ. शिवमुनीजी यांच्यासारख्या महान संताला ७८ व्या वाढदिवसादिवशी सन्मानित करताना साक्षात परमेश्वराची आराधना केल्याचा अनुभव आला,’ अशी भावना डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi