Ad will apear here
Next
हिमायतनगरात यंदाही कावड यात्रेचे उत्साहात आयोजन
हिमायतनगर : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी कावड यात्रा काढण्याचा हिमायतनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. बजरंग दलाचे तालुका संयोजक गजानन चायल यांच्या वतीने दर वर्षी ही यात्रा आयोजित केली जाते. यंदा २६ ऑगस्ट रोजी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

इस्लापूर येथील सहस्रकुंड येथून पैनगंगा नदीतील पाणी कावडीतून २० किलोमीटर चालत आणून हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरात महादेवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर यात्रेकरू स्वतःच्या आई-वडिलांचे पाय धुतात. गेली अनेक वर्षे ही परंपरा जोपासली जात आहे. 

सर्व कावडधारी आपल्या खांद्यावर कावड, भगवे झेंडे घेऊन प्रभू श्री रामचंद्राच्या नावाचा जयघोष करत होते. या रामनामाने सर्व परिसर दुमदुमला होता. हे सर्व कावडधारी युवक गावाला पायी प्रदक्षिणा घालून शेवटी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात एकत्र येऊन महादेवाला जलाभिषेक करतात. परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरशेठ श्रीश्रीमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा निघते. 

युवा सेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर, बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल, नगराध्यक्ष कुणाल राठोड, गजानन मांगुळकर, बंडू अनगुलवार, विपुल दंडेवाड, अजय बेदरकर, योगेश चिल्कावार, शुभम दंडेवाड, शीतल सेवनकर, अमोल धुमाळे, देविदास शिंदे यांच्यासह तालुक्यातील खेड्यांतील व परिसरातील शेकडो तरुण मोठ्या संख्येने या कावड यात्रेत सहभागी झाले होते.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language