Ad will apear here
Next
‘टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ’ ही सर्वांत मोठी बिझनेस क्विझ एक सप्टेंबरपासून
मुंबई : दर वर्षी देशभरातील कॉर्पोरेट्स ज्याची आतुरतेने वाट बघत असतात अशी भारतातील सर्वांत मोठी कॉर्पोरेट क्विझ टाटा क्रुसिबल यंदा एक सप्टेंबरपासून सुरु होत आहे. स्पर्धेचे हे सोळावे वर्ष असून, व्हीबीटी, गुवाहाटीपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २५ शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) यासारख्या स्वयंचलित, कनेक्टेड व अधिक जास्त स्मार्ट तंत्रज्ञानांसहीत सुरुवातीपासून शेवटापर्यंत डिजिटलायझेशनच्या दिशेने उद्योगक्षेत्राची सध्याची वाटचाल लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी या क्विझची संकल्पना ‘इंडस्ट्री ४.०’ अशी ठरवण्यात आली आहे. ही स्पर्धा टाटा, तसेच टाटा व्यतिरिक्त इतर कंपन्यांसाठीदेखील खुली आहे. प्रत्येक कंपनीतून दोन कर्मचाऱ्यांचा एक गट त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून सर्वाधिक जवळ असलेल्या शहरातील क्षेत्रीय फेरीमध्ये सहभागी होऊ शकेल.

या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना टाटा सर्व्हिसेसचे कॉर्पोरेट ब्रँड व मार्केटिंगचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अतुल अग्रवाल म्हणाले, ‘टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझने कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे ज्ञान वाढविण्याचा व आजच्या महत्त्वाच्या विषयावर विचार, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठीचा प्रभावी, रोमांचक व मनोरंजक मंच म्हणून आपली खास ओळख निर्माण केली आहे. दर वर्षी नवनवीन, रोचक संकल्पना सादर करत या क्विझने अधिकाधिक मोठे मानदंड पार केले आहेत. यंदाच्या वर्षीदेखील या स्पर्धेला लक्षणीय यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे.’  

व्यवसाय, उद्योगक्षेत्राचे सखोल ज्ञान, धोरणात्मक विचारसरणी, जोखीम घेण्याची हुशारी व क्षमता, सांघिक भावना हे सर्व गुण सर्वाधिक प्रमाणात ज्या संघाकडे असतील तोच संघ यामध्ये शेवटपर्यंत टिकू शकतो. अगदी सुरुवातीपासून या स्पर्धेचे संयोजन ख्यातनाम क्विझमास्टर गिरी बालसुब्रमणियम ‘पिकब्रेन’ करत असून, यंदादेखील त्यांच्यावरच ही जबाबदारी असणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय फेरीच्या विजेत्या संघाला झोनल फेरीमध्ये सहभागी होता येईल आणि झोनल फेरीत जिंकणाऱ्या पहिल्या दोन संघांना ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार असलेल्या राष्ट्रीय अंतिम फेरीत भाग घेता येईल. राष्ट्रीय अंतिम फेरीच्या विजेत्यांना पाच लाख रुपयांचे महापारितोषिक, तसेच टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन गौरविले जाईल. क्षेत्रीय विजेते व उपविजेत्यांना अनुक्रमे ७५ हजार रुपये व ३५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. यंदा या स्पर्धेची बक्षिसे टाटा क्लिकच्या सहयोगाने दिली जाणार आहेत. 

टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित नोंदणी करा. 

 नाव नोंदणी व माहितीसाठी :  https://www.tata.com/cruciblequiz
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language