Ad will apear here
Next
पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला राष्ट्रीय पातळीवरील कायाकल्प पुरस्कार
स्वच्छता अभियान राष्ट्रीय सर्वेक्षणात खासगी रुग्णालयांमध्ये प्रथम क्रमांक
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘कायाकल्प २०१९’ पुरस्कार डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील, डॉ. बी. के. राव आदी

नवी दिल्ली : राष्ट्रीय आरोग्य मिशन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियान सर्वेक्षणात पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्र खासगी रुग्णालयांमध्ये सर्वोत्तम ठरले आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘कायाकल्प २०१९’ हा पुरस्कार देऊन हॉस्पिटलचा सन्मान करण्यात आला. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते संस्थेचे विश्वस्त  डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, आरोग्य सचिव प्रीती सुदान, डॉ. बी. के. राव आदी मान्यवर उपस्थित होते.    

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यंदा प्रथमच कायाकल्प पुरस्कार स्पर्धेसाठी देशातील ६५३ खासगी रुग्णालयांचाही सर्वेक्षणात समावेश केला होता. रुग्णसेवेचा दर्जा, स्वच्छता, देखभाल, संसर्ग नियंत्रण, जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन, जनजागृती आदी विविध निकषांचा सर्वेक्षणात समावेश होता. या विभागात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालक डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलने ही कामगिरी केली. देशभरातील ११ खासगी रुग्णालयांचा या वेळी गौरव करण्यात आला.

‘राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळणे, हा फक्त आमच्या हॉस्पिटलचा बहुमान नसून, महाराष्ट्राचा तसेच आमच्या पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीचाही बहुमान आहे. पिंपरीसारख्या उद्योगनगरीत जागतिक स्तरावरील सोयीसुविधायुक्त हॉस्पिटल व रिसर्च सेंटर उभारण्याचे माझे स्वप्न होते. ते पूर्ण होतानाच राष्ट्रीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. या हॉस्पिटलला आजवर देश-विदेशातील असंख्य मान्यवरांनी भेट दिली आणि प्रत्येक जण येथील सुविधा पाहून थक्क झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या रुग्णसेवेच्या सर्व योजना या हॉस्पिटलमध्ये राबविण्यात येतात,’ अशी प्रतिक्रिया डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली.   

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलची २०१८ मध्ये ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. येथे अत्यंत उच्च दर्जाचे ३० मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, तसेच १९ बाह्यरुग्ण विभाग असून, हायटेक रोबोटिक सेंटरही आहे. जवळपास सर्व आजारांवर या ठिकाणी अद्ययावत उपचार केले जातात. येथील बालरुग्ण विभाग देशात सर्वोत्तम ठरावा, असा दावा हॉस्पिटलतर्फे केला जातो. 

राज्यातील तीन सरकारी रुग्णालयांचा गौरव
दरम्यान, केंद्र सरकारच्या स्वच्छताविषयक निकषांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाला सरकारी रुग्णालयांच्या विभागात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. या विभागात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय उपविजेते ठरले. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाने ग्रामीण रुग्णालयांमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi