Ad will apear here
Next
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त कलावंतांचा सत्कार
ज्येष्ठ संगीतज्ज्ञ इनॉक डॅनियल्स यांना ‘जीवन गौरव’


पुणे :
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दर वर्षी देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतज्ज्ञ इनॉक डॅनियल्स यांना ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यंदा बालगंधर्व रंगमंदिराचा ५२ वा वर्धापनदिन आहे.

या  निमित्ताने, रंगभूमीशी निगडित असलेल्या सर्व घटकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘बालगंधर्व परिवारा’तर्फे २४, २५ व २६ जून असे तीन दिवस कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून, यामध्ये विविध कलाविष्कार सादर केले जातात. त्याचप्रमाणे ज्येष्ठ व युवा कलावंतांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. 

यंदा ज्येष्ठ संपादक मुकुंद संगोराम यांना सांस्कृतिक लेखनासाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. नाटक विभागातून अनुराधा राजहंस यांना संगीत नाटकासाठी, दिग्पाल लांजेकर यांना दिग्दर्शनासाठी, तर सीमा चांदेकर व विद्या भागवत यांना अभिनयासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language