Ad will apear here
Next
सरकारच्या कामगिरीमुळे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन


मुंबई :
‘केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने आखलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांमुळे देशाची वाटचाल समृद्ध, विकसित राष्ट्राच्या दिशेने चालू आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी मुंबईत केले. 

कामगार नेते बळवंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील माथाडी कामगार संघटना, मुंबई मासे विक्रेते संघटना आणि जिल्हा कोळी महिला संघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते. 



या वेळी भाजप विधिमंडळ पक्षाचे प्रतोद आमदार राज पुरोहित, आमदार रमेश पाटील, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि प्रदेश कोषाध्यक्षा शायना एनसी आदी उपस्थित होते. 

या वेळी महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे नेते बळवंतराव पवार, दादासाहेब मोरे, प्रकाश पाटील, अरुण संख्ये, संदीप पवार, ज्ञानेश्वर मुसळे, हनीफ अन्सारी, विलास पाटील, रमेश सिंग, प्रदीप साळुंके, राजाराम पाटील, अबुभाई पटेल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई जिल्हा कोळी महिला संघाच्या अध्यक्षा छाया ठाणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. 

माथाडी कामगार, तसेच कोळी बांधव भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे राहतील, असा विश्वास बळवंतराव पवार यांनी या वेळी व्यक्त केला. याच कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वैभव चोरगे, मुंबादेवी व्यापारी संघाचे लोकेश जैन, पुणे जिल्ह्यातील संजय पाचुंगे, परीक्षित थोरात, संपत गाडे आदी कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi