Ad will apear here
Next
‘एमएमसीओए’तर्फे स्थापत्यकलेमधील पुरस्कार प्रदान
सोमिक देउरा आणि व्योमा पोपट यांच्यासह मान्यवर

पुणे : मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे (एमएमसीओए) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज इन आर्किटेक्चरच्या (एनआयएएसए) सहकार्याने स्थापत्यकलेमधील उत्कृष्टतेसाठी नुकतेच राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या परिषदेचे उद्घाटन सीओएचे सदस्य अभय पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. याअंतर्गत नॅशनल अॅवॉर्डस फॉर एक्सलन्स इन आर्किटेक्चरल थिसिस २०१९ आणि स्टुडंटस अॅवॉर्डस फॉर एक्सलन्स इन डॉक्युमेंटेशेन ऑफ आर्किटेक्चरल हेरिटेज २०१९ यांचा समावेश होता. या पश्चिेम विभागाच्या फेरीत नवी मुंबई येथील बी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा विद्यार्थी सोमिक देउरा आणि मुंबईतील कमला रहेजा कॉलेजची विद्यार्थिनी व्योमा पोपट हे विजेते ठरले. त्यांनी आता राष्ट्रीय फेरीत प्रवेश मिळविला आहे.

तीन दिवसाच्या या कार्यक्रमात पश्चिाम भारतातील ६३ महाविद्यालयांमधील ९७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

समारोपप्रसंगी मराठवाडा मित्रमंडळचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य डॉ. सुप्रिया नेने, आर्किटेक्ट प्रकाश देशमुख, सीओएच्या ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे संचालक आर्किटेक्ट जे. डी. देशपांडे, परीक्षक मंडळातील तज्ज्ञ आर्किटेक्ट शबिना खन्ना, आरती ग्रोव्हर व विद्याधर वाडीयर, समन्वयक प्रा. प्रीती जोगळेकर आणि प्रा. सौरभ जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi