Ad will apear here
Next
मेंढापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बबन पाटोळे
पंढरपूर : सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधून झाल्यानंतर आता उपसरपंचपदाच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाल्याचा प्रत्यय तालुक्यातील मेंढापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आला. २० डिसेंबरला झालेल्या या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी बबन वसंत पाटोळे यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी त्यांची गावातून जल्लोषात मिरवणूक काढली.

मेंढापूर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. यात अखिल भारतीय नाट्य परिषदेचे दिलीप कोरके यांच्या पत्नी जाई कोरके सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांनी सरपंचपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपसरपंचपदाची निवडणूक २० डिसेंबरला झाली. या पदासाठी बबन पाटोळे यांचा एकच अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब औसेकर यांच्याकडे दाखल झाला. त्यामुळे श्री. औसेकर यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

या वेळी गाव कामगार तलाठी डी. एम. पाटोळे, ग्रामसेवक एस. डी. हाडपे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे दिलीप कोरके, निवृत्त पोलीस अधिकारी भास्कर पवार, सरपंच जाई कोरके, रावसाहेब पवार, शाहू पवार, राजाराम पवार, सुधीर पवार, पांडुरंग पवार, हरी कोकरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नाना पाटील, प्रकाश पाटील, सुरज पवार, पंचायत समितीच्या सदस्या अर्चना पाटोळे, उमेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या निवडणुकीत उपसरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहण्यासाठी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

श्री. पाटोळे बिनविरोध उपसरपंच होताच कार्यकर्त्यांनी त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language