Ad will apear here
Next
‘चला हवा येऊ द्या’ला ‘यूके’त प्रचंड प्रतिसाद
लंडन : ‘चला हवा येऊ द्या’च्या येथील प्रयोगात डॉ. नीलेश साबळे यांच्यासमवेत ​​‘बाराखडी’चे अमोघ धामणकर आणि गंधार बाबरे.​पुणे : झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’च्या विश्व दौऱ्यातील लंडन येथील कार्यक्रमाला १२ नोव्हेंबरला लंडनवासीयांच्या प्रचंड प्रतिसाद लाभला. यासाठी युनायटेड किंग्डममधील (यूके) ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ने पुढाकार घेतला होता.

ट्रॉक्सी या प्रख्यात थिएटरमध्ये हा कार्यक्रम झाला. ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ची गाजलेली टीम यात सहभागी झाली होती. यामध्ये डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे या कलावंतांचा समावेश होता.

त्यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे फारूळे बाई, पुणेरी बाई, प्रवीण परडे यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘झी मराठी’वर सध्या गाजत असलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील कलाकार अभिजित खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांच्याशी मनमुराद गप्पांचा कार्यक्रमही या दरम्यान झाला.

​​‘बाराखडी’च्या ​भावी उपक्रमांबद्दल डॉ. साबळे यांनी शुभेच्छा दिल्या.​​​ ‘अमोघ धामणकर आणि गंधार बाबरे यांनी चांगली संहिता, नवीन प्रयोग आणि व्यावसायिकता या तीन महत्त्वाच्या निक​षां​वर भर दिला. रसिकांची ​अशी साथ नवीन ​संकल्पना लंडन, ‘यूके’त आणायला नक्कीच प्रेरणादायी ठरते,’ असे त्यांनी या वेळी नमूद करून सर्व प्रेक्षकांचे आभार ​मानले. 

या कार्यक्रमासाठी झी मराठी, वीणा वर्ल्ड, रॅपचिक, रोटीमॅटीक, नक्षी डॉट कॉम यांचे सहकार्य लाभले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language