Ad will apear here
Next
रोपळे गावातील पाटील विद्यालयात कृषी दिन साजरा
विद्यार्थ्याने उन्हाळी सुट्टीत तयार केलेल्या हादग्याच्या रोपांची लागवड


सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यात एक जुलै रोजी विविध उपक्रमांनी कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. साहिल काळे या विद्यार्थ्याने उन्हाळी सुट्टीत तयार केलेल्या हादग्याच्या रोपांची प्रशालेच्या प्रांगणात लागवड करण्यात आली.  दरम्यान, पावसाने हजेरी लावल्यामुळे कृषी दिन सार्थकी लागल्याची भावना शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

पर्यावरणाची आवड असल्यामुळे या विद्यालयातील इयत्ता आठवीतील साहिल काळे या विद्यार्थ्याने उन्हाळी सुट्टीत विविध जातीच्या झाडांची रोपे तयार केली. त्यातील हादग्याच्या रोपांची प्रशालेच्या प्रांगणात लागवड करण्यात आली. मुख्याध्यापक बिभीषण पाटील व पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लागवड करण्यात आली.  



या प्रशालेतील विद्यार्थी ग्रामीण भागातील असले, तरी शेतीवरील त्यांची निष्ठा ढळू नये, शेतीत असलेली गोडी कायम राहावी म्हणून मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे महत्त्व पटवून दिले. या वेळी पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील, सोमनाथ जगताप, बी. एम. पुजारी, संतोष रोकडे, राजकुमार व्यवहारे, विलास वाडेकर, विनायक निंबाळकर आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनी रोपांची लागवड करण्यासाठी खड्डे खोदले. उन्हाळी सुट्टीत रोपे तयार करणाऱ्या साहिल काळे या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक पाटील व पर्यवेक्षक पाटील यांनी कौतुक केले.

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language