Ad will apear here
Next
मोहक युरोप + साद ऑस्ट्रेलियाची + मुशाफिरी आवडलेल्या देशांची
पर्यटनासाठी बाहेर गेल्यानंतर त्याची माहिती वाचकांपर्यंत प्रवासवर्णनातून पोहोचविण्याचे काम काही पर्यटक करतात. लता गुठे यांनी हे काम ‘मोहक युरोप’ या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. लंडन, कलेचे माहेरघर पॅरिस, ब्रुसेल्स, कालव्यांचे शहर अॅमस्टरडॅम, ऐतिहासिक रोम, व्हेनिस अशा शहरांची सफर यातून होते. ऑस्ट्रेलिया या देशाची निर्मिती, इतिहास, भूगोल कथन केल्यानंतर क्वीन्सलँडमधील गोल्ड कोस्ट, सी वर्ल्ड, केनर्स, दी ग्रेट बॅरियर रीफ, मेलबर्न, सिडनी या शहरांमधील पर्यटनस्थळांची माहिती मधुबाला पाटील यांनी ‘साद ऑस्ट्रेलियाची’ या पुस्तकामध्ये दिली आहे. ‘मुशाफिरी आवडलेल्या देशांची’ या पुस्तकामधून सुवर्णा अशोक मयेकर यांनी पाच-सहा देशांतून फिरवून आणले आहे. दक्षिण आफ्रिका, आनंदी-समाधानी देश भूतान, केनियातील जंगल सफारी, फ्रान्स, केनिया, स्वित्झर्लंड आदी देशांबरोबरच भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील लेह-लडाख, सिक्कीम आदी राज्यांची माहिती उपयुक्त आहे. 

पुस्तक : मोहक युरोप
लेखिका : लता गुठे
पुस्तक : साद ऑस्ट्रेलियाची
लेखिका : मधुबाला पाटील
पुस्तक : मुशाफिरी आवडलेल्या देशांची
लेखिका : सुवर्णा मयेकर
प्रकाशक : भरारी पब्लिकेशन्स
(एकत्रित) पृष्ठे : ४५०
(एकत्रित) मूल्य : ५०० रुपये

(मोहक युरोप, साद ऑस्ट्रेलियाची, मुशाफिरी आवडलेल्या देशांची या तीन पुस्तकांचा संच ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language