Ad will apear here
Next
हडपसर येथे रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन


पुणे : मज्जासंस्थेशी निगडित अर्धांगवायू आणि इतर आजारांवर उपचार आणि रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनीयुक्त रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरची स्थापना हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. या सेंटरचे उद्घाटन १९ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९.१५ वाजता हडपसर येथील सहयाद्री हॉस्पिटलमध्ये होणार आहे.

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनने यासाठी पुढाकार घेतला असून, त्यासाठी ४० लाख रुपये खर्चून अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. या क्लबच्या अध्यक्षा अमृता देवगावकर, माजी अध्यक्ष गणेश जाधव, गिरीश मठकर यांनी ही माहिती दिली. बायोडेक्स बॅलन्स सिस्टिम, बायोडेक्स सीट टू स्टँड ट्रेनर, पाब्लो सिस्टिम, इन्फ्रारेड लेझर थेरपी, मॅट्रीक्स ऱ्हिदम थेरपी, लिव्हा को- ऑर्डिनेशन डायनॉमिक थेरपी मशीन अशी उपचार सामग्री पुण्यात प्रथमच उपलब्ध होत असून, या सुविधा रुग्णांना सवलतीच्या दरात मिळणार आहेत.

‘रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१’चे प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन होणार असून, या वेळी माजी प्रांतपाल अभय गाडगीळ, सह्याद्री हॉस्पिटल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त आपटे उपस्थित राहणार आहेत. ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’, ‘३८००’, रोटरी क्लब आकुर्डी, रोटरी क्लब पाषाण, रोटरी क्लब लक्ष्मी रोड यांनी या प्रकल्पात ग्लोबल ग्रांट पार्टनर म्हणून सहकार्य केले आहे.

उद्घाटनाविषयी :
दिवस :
शनिवार, १९ जानेवारी २०१९
वेळ : सकाळी ९.१५ वाजता
स्थळ : सह्याद्री हॉस्पिटल, हडपसर, पुणे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language