Ad will apear here
Next
२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन
लायन्स क्लबतर्फे ‘प्रदूषणविरहित गणेशविसर्जन’ उपक्रम

पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा आर्जवाबरोबरच त्याचे विसर्जन प्रदूषणविरहित व्हावे, यासाठी लायन्स क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘प्रदूषणविरहित विसर्जनाचा श्रीगणेशा’ या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात छोट्या-मोठ्या मिळून एकूण २२०० गणेशमूर्ती व साडेसात टन निर्माल्य संकलित करण्यात आले. 

‘पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३२ लायन्स क्लब एकत्रित आले व त्यांनी गणेशभक्तांना मूर्ती विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गणेशभक्तांनी मूर्तींचे दान केले. तब्बल २२०० मूर्ती आणि साडेसात टन निर्माल्य संकलित करण्यात आले,’ अशी माहिती लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या जलप्रदूषण विभागाचे जिल्हाध्यक्ष लायन किशोर मोहोळकर यांनी दिली.

किशोर मोहोळकर म्हणाले, ‘प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील भिडे पूल, राजाराम पूल, निलायम टॉकीज, नटेश्वर विविध घाटांवर ३२ क्लबमधील साधारणपणे तीन हजार सदस्यांनी, विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या उपक्रमाचे उद्घाटन ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री यांच्या हस्ते झाले. या वेळी सागर भोईटे, अनिल मंद्रुपकर, योगेश कदम यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरच्या घरी मूर्ती विसर्जन करण्यासह मूर्तीदानाचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचे (खाण्याचा सोडा) वाटप केले. त्यात दोन हजारपेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जनानंतर ही पावडर हौदात टाकण्यात आली. गुरुवारी, १२ तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत २२०० मूर्ती संकलित केल्या असून, त्या सर्व मूर्ती म्हाळुंगे येथील श्री फाउंडेशनला, तर संकलित निर्माल्य कंपोस्ट खताच्या निर्मितीसाठी पाठवण्यात आले.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language