Ad will apear here
Next
हिमायतनगरच्या बजरंग गणेश मंडळातर्फे महारक्तदान शिबिर
११ वर्षांची परंपरा


हिमायतनगर :
हिमायतनगर शहरातील बजरंग गणेश मंडळाने ११ वर्षांची परंपरा कायम राखून या वर्षीही महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग संरक्षण मंत्रालयाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. जखमी सैनिकांच्या उपचारांसाठी याचा वापर करण्यात येणार आहे. ‘भारतीय लष्कराला आमच्या बजरंग गणेश मंडळाकडून हा छोटा मदतीचा हात आहे,’ असे हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी या वेळी सांगितले.या रक्तदानाच्या दिवशी शहरातील जास्तीत जास्त डॉक्टर स्वतः रक्तदान करतात आणि शहरातील युवकांनाही रक्तदान करण्यासाठी आवाहन करतात. या वेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस निरीक्षक भगवान कांबळे म्हणाले, ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. अशा सामाजिक उपक्रमाचा आदर्श शहरातील सर्वच मंडळांनी घ्यावा.’

परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार, नगराध्यक्ष कुणाल राठोड, शामजी रायेवार, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान पठाण, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकरअण्णा मुधोळकर, विठ्ठल ठाकरे, विलास वानखेडे, राम नरवाडे, रामदास रामदिनवार, संतोष गाजेवार, डॉ. दिगंबर माने, बाळूअण्णा चवरे, पत्रकार प्रकाश जैन, दत्ता शिराने, अनिल मादसवार, दिलीप शिंदे, सोपान बोम्पिलवार, वसंत राठोड, जांबुवंत मिराशे, नागेश शिंदे, बजरंग गणेश मंडळाचे अध्यक्ष विपुल दंडेवाड, परशूअण्णा, गजानन चायल, गजानन मांगुळकर, विशाल राठोड, राजू जैस्वाल, सावन डाके, योगेश चिल्कावार, प्रकाश रामदिनवार, पापा शिंदे, शुभम दंडेवाड, नागेश शिंदे, दीपक कात्रे, दुर्गेश मंडोजवार, मंगेश धुमाळे, अमोल धुमाळे, नितीन मुधोळकर, बास्टेवाड, अजय बेदरकर, सुधाकर चिट्टेवाड, प्रशांत हेन्द्रे, गजू शिंदे, कल्याण ठाकूर आदी या वेळी उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language