Ad will apear here
Next
विकार मनाचे
‘शारीरिक आजारांकडे आपण जितक्या वस्तुनिष्ठपणे पाहतो तितक्याच वस्तुनिष्ठपणे मानसिक विकारांकडे पाहायला हवे,’ असे डॉ. हिमानी चाफेकर म्हणतात. मानसिक विकारांकडे शास्त्रीय नजरेतून वस्तुनिष्ठपणे पाहून डॉ. चाफेकर यांनी हे लेखन केले आहे.  

या पुस्तकात एकूण १३ विभाग असून, प्रारंभी त्यांनी मनोविकारावर आयुर्वेद आणि होमिओपॅथीतील उपचारांची माहिती दिली आहे. त्यानंतर विविध मानसिक विकारांची विस्ताराने माहिती दिली आहे. मन:स्थितीविषयक विकृती, चिंताव्याकूळ विकृती, छिन्नमनस्कता, इटिंग डिसऑर्डर, डिलिरियम, डिमेंशिया आणि अॅम्नीझिया या विकारांची स्वतंत्र प्रकरणांमधून माहिती समजते. ही माहिती देताना डॉ. चाफेकर आजाराच्या लक्षणांबरोबरच मानसिक, शारीरिक कारणांचा वेध घेत उपचारांबाबतही सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. हे सांगताना अनेक उदाहरणे समोर ठेवली आहेत. एकूणच विकार लपविण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन उपचार करण्याचे बळ या लेखनामधून मिळते.  

प्रकाशक : उषा अनिल प्रकाशन
पाने : २७२  
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language