Ad will apear here
Next
‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’
कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग हा भारत व रशिया यांच्यातील सांस्कृतिक बंध असून, रशियन भाषा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा बंध अधिक दृढ होत आहे,’ असे प्रतिपादन रशियातील मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. द्मीत्री सकलोव यांनी केले. विदेशी भाषा विभागातील रशियन भाषेच्या विद्यार्थ्यांशी ‘मुक्त संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी डॉ. मार्गारिता रेमीजवा याही उपस्थित होत्या.

रशियातील दैनंदिन जीवन, पाककला, कुटुंब व विवाह पद्धती या संदर्भातील अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. द्मीत्री सकलोव यांनी या वेळी दिलखुलास उत्तरे दिली. राईपासून बनवलेला काळा पाव व फाउंडेशन कॅव्हिअर म्हणजे खारवलेली माशांची अंडी हे रशियातील लोकांचे आवडते अन्न आहे. त्यांनी खास रशियातून सोबत आणलेली ‘मत्र्योश्का’ ही लाकडी बाहुली, तसेच काळा पाव व फाउंडेशन कॅव्हिअर या पदार्थांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्याचबरोबर सोव्हिएत व उत्तर-सोव्हिएत काळातील जीवनशैलीमधील फरकही स्पष्ट केला. रशियन लोकांना भारतातील निसर्ग अतिशय प्रिय असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज रशियन स्त्रीने जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले असून, रशियन स्त्रिया अतिशय कणखर व स्वतंत्र असल्याचे डॉ. मार्गारिता रेमीजवा यांनी सांगितले. विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. सहयोगी शिक्षिका शीतल कुलकर्णी व प्रियांका माळकर उपस्थित होत्या.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language