Ad will apear here
Next
‘पेटीएम’द्वारे ‘टॅप कार्ड’चा शुभारंभ
मुंबई : भारतातील अग्रणी पेमेंट गेटवे ‘पेटीएम’ने आपल्या सेवांचा विस्तार करताना ‘पेटीएम टॅप कार्ड’ या देशातील पहिल्या ऑफलाइन पेमेंट सोल्युशनचा शुभारंभ करून आपल्या सेवांचा विस्तार वाढवला आहे.

इंटरनेट न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण आणि सोपी पेमेंट सोल्युशन पुरविण्याच्या कंपनीच्या ध्येयाशी सुसंगत अशी ही नवी सुविधा आहे. या कार्डमध्ये सुरक्षित आणि सोयीस्कर डिजिटल पेमेंट करण्यासाठी नीयर फील्ड कम्युनिकेशन या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आहे, हे पेमेंट संपूर्णपणे ऑफलाइन असेल व ते ‘पेटीएम’द्वारा जारी करण्यात आलेल्या ‘एनएफसी पीओएस’ केंद्रांमध्ये क्षणार्धात करता येऊ शकेल. पेमेंट करण्यासाठी वापरकर्ते टॅप कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून व कोणत्याही अॅड व्हॅल्यू मशीनवर त्याचे प्रमाणीकरण करून आपल्या ‘पेटीएम’ खात्यातून पैसे देऊ शकतील.

‘पेटीएम’चे सीओओ किरण वासिरेड्डी म्हणाले, ‘जीवनातील प्रत्येक टप्प्यावर डिजिटल पेमेंट करण्यासाठी आम्ही ग्राहकाला प्रेरित करत आहोत. असे बरेच लोक असतात, ज्यांच्याकडे कधी कधी इंटरनेट उपलब्ध नसते किंवा त्यांचे दैनिक बजेट मर्यादित असते, ज्यामुळे ते ऑनलाइन पेमेंट करत नाहीत. अशा लोकांसाठी आम्ही ‘पेटीएम टॅप कार्ड’ सादर करत आहोत, ज्याचा उपयोग करून ते सहजतेने ऑफलाइन पेमेंट करू शकतील. याचा व्यापक प्रसार होण्यासाठी आम्ही अधिकाधिक व्यापाऱ्यांसह संपर्क साधून त्यांना टॅप कार्डद्वारे पेमेंट स्वीकारण्यासाठी एनएफसी पीओएस टर्मिनल्सने सुसज्ज करत आहोत.’

पेटीएम टॅप कार्ड हे पेमेंटसाठी रांगा लावण्याच्या परंपरेस छेद देणारे उत्तम सोल्युशन आहे व ते ग्राहक किंवा व्यापाराला येणाऱ्या नेटवर्कशी संबंधित अडचणींवर देखील मात करते. पेमेंट करणे सुविधाजनक करण्याच्या आपल्या प्रयत्नांत पहिल्या टप्प्यात पेटीएम शैक्षणिक संस्था आणि कोर्पोरेट्सशी भागीदारी करून, या कार्डच्या मदतीने झटपट डिजिटल पेमेंट करण्यास मदत करणार आहे. पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला फक्त मर्चंट टर्मिनलवर कार्ड टॅप करावे लागेल. अशाप्रकारे, आपला फोन जवळ नसताना देखील पेटीएममार्फत पेमेंट करण्याचा उपाय या मंचाने ग्राहकांसाठी सादर केला आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language