Ad will apear here
Next
रोबोटिक्स प्रदर्शनास तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांची भेट

पुणे : ताथवडे येथील जेएसपीएम संचालित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकी विभाग व इंडिया फर्स्ट रोबोटिक्स या कंपनीच्या वतीने रोबोटिक्स तंत्रज्ञानावरील एक प्रदर्शन नुकतेच महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. या प्रदर्शनामुळे रोबोटिक्स या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.  

‘रोबोटिक्स व ऑटोमेशन या तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची ओळख व प्रशिक्षण देणे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते,’ अशी माहिती यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश बडदे आणि इंडिया फर्स्ट रोबोटिक्स कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत गायकवाड यांनी दिली. 

‘महाविद्यालयास शैक्षणिक स्वायत्तता मिळाल्यामुळे यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामध्ये रोबोटिक्स व ऑटोमेशन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे,’ अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांनी दिली. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi