Ad will apear here
Next
अनोखा अमेरिरंग
अमेरिका एक जागतिक महासत्ता, बलाढ्य, संपन्न देश. जगात काहीही घडले, की लक्ष अमेरिकेकडे असते. बहुतेकांचे आकर्षण असलेली अमेरिका बहुरंगी, बहुढंगीही आहे. अशा अमेरिकेचे अंतरंग डॉ. मेधा गुप्ते-प्रधान यांनी ‘अनोखा अमेरिरंग’ या पुस्तकातून उलगडले आहेत. न्यूयॉर्क म्हणजे अमेरिका आणि अमेरिका म्हणजे न्यूयॉर्क अशी ठाम समजूत असते. असे होण्याचे कारण देताना या चिरतरुण नगरीचा इतिहास, भूगोल, तेथून सुरू झालेल्य अमेरिकेच्या भरभराटीबद्दल लेखिकेने सांगितले आहे. स्मोकी माउंटन राष्ट्रीय उद्यानाची सैर त्यांनी घडवली आहे. बहुरंगी दक्षिण अमेरिकेतील गुलामगिरी, स्वातंत्र्य, तेथील संगीताचा वारसा, श्वेत व कृष्णवर्णीयांचा संघर्षही त्यांनी मांडला आहे. दक्षिण टोक असलेल्या की वेस्टमधील निवांतपणा, त्या भूमीतील विविध क्षेत्रांतील दिग्गज, स्थानिक जीवन या गोष्टीही या पुस्तकातून जाणून घेता येतात. कधी काळी ‘वाइल्ड वाइल्ड वेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे नेवाडा, कोलोरॅडो, कॅलिफोर्नियाचे रंग, अनोखे अलास्का, सप्तरंगी इंद्रधनूच्या कमानींचे हवाई बेट अशा विविध ठिकाणांची ओळख या पुस्तकातून लेखिकेने करून दिली आहे.

पुस्तक : अनोखा अमेरिरंग
लेखिका : डॉ. मेधा गुप्ते-प्रधान
प्रकाशन : अविरत प्रकाशन
पृष्ठे : १०२
मूल्य : १२५ रुपये

(‘अनोखा अमेरिरंग’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language