Ad will apear here
Next
‘भारत हा वाहन उद्योगासाठी जागतिक स्तरावर महत्त्वाचा देश’
निखिल ओसवाल यांचे प्रतिपादन
‘पुणे मोटार शो’मध्ये निखिल ओसवाल, पुण्यातील एकमेव महिला फॉर्म्युला फोर रेस कार ड्रायव्हर डायना पंडोले, मोटार टेस्टर राहुल बाम यांच्याशी विशाल मीनावाला यांनी संवाद साधला

पुणे  : ‘आज भारतात वाहनउद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान, उत्पादन अशा सर्वच आघाड्यांवर बदल होत आहेत, त्यामुळे हे क्षेत्रदेखील आता ‘ग्लॅमरस’ झाले असून, जागतिक स्तरावर भारत वाहनउद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचा देश ठरत आहे,’ असे प्रतिपादन ग्लोबल इंडियन बिझनेस फोरमच्या इंटरनॅशनल सप्लाय चेन एज्युकेशन अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वर्ल्ड ट्रेड सेंटर, पुणेचे निखिल ओसवाल यांनी केले. 

पुण्यातील एकमेव महिला फॉर्म्युला फोर रेस कार ड्रायव्हर डायना पंडोले, नावाजलेले मोटार टेस्टर राहुल बाम आणि ओसवाल यांच्याशी विशाल मीनावाला यांनी संवाद साधला. ‘प्राइमव्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’च्या संचालिका वीणा जोशी या वेळी उपस्थित होत्या.  
 
‘वाहन उद्योग क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्याची भारतामध्ये प्रचंड क्षमता असून, दर वर्षी दोन कोटी  वाहनांची निर्मिती करणारा चीन हा आपला प्रतिस्पर्धी आहे; मात्र पुढील तीन वर्षांत भारतात या क्षेत्रातील जगभरातील महत्त्वाचे ब्रँड असतील,’ असेही ओसवाल यांनी नमूद केले.      

‘प्राइमव्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’च्या वतीने येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या मैदानात जागतिक स्तरावरील ‘पुणे मोटार शो २०१९’ चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘वाहन उद्योग क्षेत्र आणि भविष्य’ या विषयावर ओसवाल यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
  
ओसवाल म्हणाले, ‘आज हायड्रोजन इंधन वाहने, इलेक्ट्रिक वाहने ही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात नाहीत, मात्र जेव्हा मोठ्या प्रमाणात त्यांचे उत्पादन होईल आणि ती बाजारात येतील तेव्हा त्यांच्या किंमतीत नक्कीच फरक पडेल आणि नव्या पिढीचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनदेखील बदलेल. आज वाहन भाडेतत्वावर घेण्याकडे तरुणाईचा सर्वाधिक ओढा असून, देशात मोठ्या प्रमाणात ‘उबरायजेशन’ होत आहे. प्रवास महत्त्वाचा असला, तरी स्वत: वाहन चालविण्यास अनेक जण फारसे इच्छुक नसतात. अशांसाठी भविष्यात तंत्रज्ञानात होणारे महत्त्वपूर्ण बदल ही जमेची बाजू असेल. याबरोबरच भविष्यात वाहनांच्या ‘क्वालिटी’ बरोबर ‘कम्फर्ट’देखील तितकाच महत्त्वाचा होणार असून, यासाठी ग्राहक मोठ्या चारचाकी गाड्यांना पसंती देत आहेत; पण या गाड्या शहरात वापरण्यावर मर्यादा असल्याने लहान, पॉवरफुल आणि परवडणाऱ्या चारचाकींची मागणी वाढेल,’ असेही त्यांनी सांगितले.  

या वेळी बोलताना डायना पंडोले म्हणाल्या, ‘एक रेसर म्हणून ट्रॅकवर गाडी चालविणे हा माझ्यासाठी नेहमीच एक थरारक अनुभव असतो आणि मला ते  थ्रील आवडते. हे करीत असताना अपघात टाळण्यासाठी काय करायला हवे, हे मला शिकायला मिळाले.’

‘मी एक महिला आहे म्हणजे चांगली चालक नसेन हे आधीच गृहीत धरून मला पडताळणारे अनुभव या क्षेत्रात अनेकदा आले; पण महिला आहे म्हणून वाईट चालक असेलच ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे,’ असे स्पष्ट मत पंडोले यांनी व्यक्त केले.  

या वेळी राहुल बाम यांनीही आपण बाइक रेसिंग क्षेत्रात कसे आलो याचे हे सांगत आपल्या मोटार ट्रेक्स आणि टेल्सविषयीचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.   
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi