Ad will apear here
Next
खासदार शिरोळेंनी केली ‘ससून’मध्ये स्वच्छता


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाअंतर्गत पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ससून रुग्णालयात स्वच्छता केली.

हे वर्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष आहे. या निमित्ताने १५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरदरम्यान देशभरात स्वच्छतेचा संदेश देत ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला पंतप्रधान मोदी यांनी सुरुवात केली आहे. या उपक्रमात देशातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत खासदार शिरोळे यांच्या पुढाकाराने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ससून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. मनजीत संत्रे हे देखील या वेळी अभियानात सहभागी झाले. या अभियानाअंतर्गत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, ससून रुग्णालयाचे कर्मचारी व शिकाऊ डॉक्टर, पुणे महानगरपालिकेचे सफाई कामगार अशा तब्बल २०० हून अधिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवीत रुग्णालय परिसरात स्वच्छता केली.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language