Ad will apear here
Next
‘खचून न जाता यशाच्या दिशेने पुढे चालत राहा’
नगरपालिका करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी विठ्ठल पाटोळे
विठ्ठ्ल पाटोळेसोलापूर : ‘अपयशाने खचून न जाता यशाच्या दिशेने पुढे चालत राहा. स्पर्धा परीक्षेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात यश न आल्यास निराश होण्याचे काहीच कारण नाही. सातत्याने प्रयत्न केल्यास एक वेळ अशी येते की आपण नक्की यशस्वी होतो,’ असा सल्ला नगरपालिका करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी विठ्ठल सत्यवान पाटोळे यांनी दिला आहे.

पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील पाटोळे यांची नगर परिषद संवर्गात नगरपालिका करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी (श्रेणी ब) निवड झाली आहे. महापरीक्षा पोर्टलतर्फे मे २०१८मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी मंगळवेढा येथील तहसील कार्यालयात तलाठी पदावर काम केले आहे. सध्या ते सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर मंत्रालयीन विभागात कार्यरत आहेत. अल्पसंख्याक विभाग, महसूल विभाग, सामान्य प्रशासन विभाग आदी मंत्रालयीन विभागातील प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर कार्यरत असतानाच त्यांची आता नगरपालिकेच्या करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘अपयशाने खचून न जाता यशाच्या दिशेने मार्गक्रमणा करत राहा. स्पर्धा परीक्षेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात यश न आल्यास निराश होण्याचे काहीच कारण नाही. प्रयत्न केल्यास एक वेळ अशी येते की आपण यशस्वी होतो. मीही अपयशातून आणि बिकट आर्थिक परिस्थितून पुढे आलो आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थांनी आर्थिक परिस्थितीचा विचार न करता स्पर्धा परीक्षा देत राहा,’ असे आवाहन पाटोळे यांनी या वेळी केले.

(विठ्ठल पाटोळे यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language