Ad will apear here
Next
ब्रिटिश लायब्ररीतर्फे रीडिंग चॅलेंज स्पर्धेचे आयोजन
साठाव्या वर्धापनदिनानिमित्त विशेष उपक्रम

पुणे : ‘ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीने साठाव्या वर्षात पदार्पण केले असून, त्या निमित्ताने रीडिंग एजन्सी यूकेच्या सहकाऱ्याने प्रतिष्ठित मानली जाणारी रीडिंग चॅलेंज स्पर्धा भारतात आणली असून, त्याची सुरुवात पुण्यापासून होणार आहे. मानवाला चंद्रावर पहिल्यांदा पाउल ठेवून पन्नास वर्षे झाली आहेत. रीडिंग चॅलेंजची संकल्पना या विषयाशी संबंधित असेल,’अशी माहिती ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या पुण्यातील प्रमुख गुंजन नरुला यांनी दिली.

गुंजन नरूला
‘ही चार आठवड्यांची स्पर्धा असून, सहा ते अकरा वर्षे  वयोगटातील मुलांसाठी आहे. ती २७ जुलै २०१९ रोजी सुरू होईल. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी कमीत कमी चार पुस्तके वाचायची आहेत. ब्रिटिश कौन्सिलतर्फे स्पर्धकांची वाचनाची गती वाढवण्यासाठी व स्टोरीटेलिंग (कथाकथन) कौशल्य विकसित करण्यासाठी अनेक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. पुस्तके वाचल्यानंतर स्पर्धकांनी  या संकल्पनेवर गोष्ट लिहून, कथन करायची आहे. स्पर्धेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी होईल. विजेत्यांना आपल्या कुटुंबासाठी लायब्ररीचे वार्षिक सदस्यत्व मोफत मिळेल, तर सध्याचे सदस्य असलेल्या स्पर्धकांना वार्षिक फॅमिली मेंबरशिपचे नूतनीकरण मोफत करून मिळेल. यासाठी २१ जुलैपासून सशुल्क नोंदणी सुरू झाली आहे,’असेही त्यांनी सांगितले.  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language